आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या जिल्‍हाध्यक्ष पदाचा लवकरच निर्णय, जुन्या की नव्या चेहऱ्याला याबाबत उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील दहा महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्‍हाध्यक्षाची नियुक्ती रखडली आहे. प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झाल्याने येत्या काही दिवसांत जिल्‍हाध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येईल, असे संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्‍हाध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले जिल्‍हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी ढाकणे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला होता. ढाकणे यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाले. मात्र, जिल्‍हाध्यक्षपद रिक्तच राहिले.

प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर जिल्‍हाध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येईल, असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. दोन आठवड्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती झाल्याने जिल्‍हाध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्‍हाध्यक्षपदासाठी खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजी कर्डिले गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे नाव या पदासाठी चर्चेत असले, तरी त्यांच्या नावाला काहींचा विरोध आहे. या पदासाठी विद्यमान शहर जिल्‍हाध्यक्ष अभय आगरकर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, जिल्‍हाध्यक्षपद ग्रामीण असल्याने त्यांना हे पद मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांच्यासह अन्य पदाधिकारीही या पदासाठी इच्छुक आहेत. लोंढे यांना विधानसभा निवडणुकीत जिल्‍हाध्यक्षपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे पद नवीन चेहऱ्याला देण्याची पक्षाची तयारी असल्याचे बोलले जाते.