आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP News In Marathi, I Will Be Lok Sabha Candidate, Divya Marathi

लोकसभेची उमेदवारी मलाच.. पत्रकार परिषदेत खासदार दिलीप गांधी यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेची उमेदवारी मलाच मिळेल अशी माझी खात्री आहे. तथापि, पक्षाचा जो निर्णय होईल, तो मी मान्य करेन, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी स्पष्ट केले.
मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे व आणलेल्या निधीबाबतची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गांधी म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय संघटनात्मक पातळीवर घेण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी 27 फेब्रुवारीला जाहीर होईल. नगरचा निर्णय 15 मार्चपर्यंत होईल, असा अंदाज आहे. त्यानंतरच माझ्या उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी दिल्लीहून निधी आणण्याचा मी प्रयत्न केला. अद्ययावत स्मशानभूमीसाठी केंद्राचा मोठा निधी मिळवला, असे गांधी यांनी सांगितले. शहरातील वळणरस्त्यावरील निंबळक येथील उड्डाणपुलाचे काम झाले असून दुसर्‍याचे काम अरणगाव परिसरात वेगाने सुरू आहे. बीड-परळी रेल्वेमार्गासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील अन्य विकासकामांसाठी 46 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात 13 कोटी 59 लाख 86 हजार रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात आले आहेत. पाच वर्षांत विविध योजनांतर्गत 1959 कोटी मंजूर करून आणले. त्यात जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी 450 कोटींचा समावेश आहे, असे गांधी म्हणाले.
खासदार निधीतून केलेल्या विकासकामांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी लवकरच ‘अर्पण’ नावाचे पाक्षिक आपण काढणार असल्याचे गांधी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
पन्नास रुपयांचे शेअर असणार्‍यांना नगर अर्बन बँकेवर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी बँकेविषयीच्या प्रश्नाला टोलवले.
पक्ष सोडणार नाही..
भाजपने उमेदवारी नाकारल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सन 2004 मध्ये मला तिकीट नाकारले होते. नंतर अनेक पक्षांनी मला बोलवले होते; पण मी पक्ष सोडला नाही. आताही अन्य पक्षांत जाण्याचा माझा विचार नाही, असे गांधी म्हणाले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडल्याबाबत विचारले असता वाकचौरे यांचा तो खासगी प्रश्न आहे. अधिवेशनाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मला वाकचौरे भेटले नाहीत. त्यांनी भेटण्याचे टाळले, असेही ते म्हणाले.
नगर-पुणे रेल्वेच्या सव्र्हेला मंजुरी
4नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी मी लोकसभेत प्रश्न मांडला होता. अर्थसंकल्पात या मार्गाच्या सव्र्हेला मंजुरी देण्यात आली. हा रेल्वेमार्ग झाल्यास वाहतुकीवरचा ताण काही प्रमाणात कमी होईल.औद्योगिकबरोबरच अन्य क्षेत्रांनाही फायदा होईल. या सव्र्हेसाठी 50 कोटी खर्च येईल असा अंदाज आहे.’’ दिलीप गांधी, खासदार