आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP News In Marathi, Shivai Kardile Not Interested For Loksbha Elections, Divya Marathi

लोकसभा लढवण्याची इच्छा नाही : शिवाजी कर्डिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरमधून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात माझे नाव असले, तरी लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मी आहे त्याठिकाणी समाधानी आहे, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी गुरुवारी (20 फेब्रुवारी) रात्री केले.
पिंपळगाव उज्जैनी येथे खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन व लोकार्पण आमदार कर्डिले यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, बाळू महाराज बोंदे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, उपसभापती शरद झोडगे, माजी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, अशोक महाराज कराळे आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, लोकसभेसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. माझेही नाव घेतले जात आहे. पण पक्षाकडे तिकिटाची मागणी मी केली नाही. त्यामुळे लोकसभा लढवण्याची इच्छा नाही. खासदार गांधी यांनी लोकसभेसाठी पुढे व्हावे मी त्यांच्याबरोबर आहे. पिंपळगाव उज्जैनी गावाने सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास साधला. गांधी म्हणाले, नगर तालुक्याच्या विकासात आमदार कर्डिले यांचे मोठे योगदान आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न के