आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Spokesperson Sahanavaja Hussain,latest News In Divya Marathi

काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला हिशेब द्यावा, भाजपचे प्रवक्ते शहनावाज हुसेन यांनी विचारला जाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 60 दिवसांचा हिशेब मागणारे काँग्रेस व राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेवर होते. आधी त्यांनी या पंधरा वर्षांत काय केले त्याचा महाराष्ट्रातील जनतेला हिशेब द्यावा, असे माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनावाज हुसेन म्हणाले.

नगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या प्रचाराची सांगता हुसेन यांच्या माणिक चौक येथील सभेने झाली. खासदार िदलीप गांधी, उमेदवार अभय आगरकर, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, माजी नगरसेवक शिवाजी लोंढे, महिला आघाडीच्या प्रमुख गीता गिल्डा, सुवर्णा पाचपुते, नगरसेवक सुवेंद्र गांधी, स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हुसेन म्हणाले, सध्या अनेक लोक अनेक प्रकारचे दावे करत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या नशिबाचा फैसला नेते करणार नसून जनता करणार आहे. महाराष्ट्रात सध्या वेगळ्या परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवत आहोत. जे लोक कालपर्यंत आमच्याबरोबर होते, जे लोक आम्हाला देशभक्त म्हणायचे, तेच लोक आम्हाला आता अफजल खानची सेना म्हणत आहेत. त्यांचे थडगे इथे तयार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी सांगितले कुणाचे थडगे कुठे व कसे तयार करायचे याचा निर्णय नेते नव्हे महाराष्ट्रातील जनता करणार आहे.
भाजपविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळाले आहे.महाराष्ट्रात पंधरा वर्षे, देशात दहा वर्षे व 60 वर्षांपासून हिंदुस्थानच्या गादीवर बसणारे काँग्रेस-राष्ट्रावादीचे नेते 60 दिवसांचा हिशेब नरेंद्र मोदी यांच्याकडे मागत आहेत. उलट त्यांनीच जनतेला आपल्या कामाचा हिशेब दिला पाहिजे.

खासदार गांधी म्हणाले, येत्या पाच वर्षांत नगर शहरात एकही झोपडपट्टी राहणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. आगरकर म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या मुद्दावर लढवली जात आहे. विद्यमान आमदाराने शहराला पिछाडीवर नेले आहे. त्यांना जनतेकडे मते मागण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही.

आमच्या दमावर ते निवडून यायचे...
नगर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हे भाजपच्या दमावर निवडून येत होते.आता भाजपने अभय आगरकरांसारखा चांगला उमेदवार दिला आहे. त्यामुळे यावेळी सशक्त पर्याय नगरकरांना मिळाला आहे.शहनावाज हुसेन, प्रवक्ते