आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP The New District District President Will Have A New Year

नव्या वर्षात मिळणार भाजपला नवे जिल्‍हाध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रखडलेल्या भाजपच्याजिल्‍हाध्यक्षपदाच्या नियुक्तीला आता नव्या वर्षाचा मुहूर्त सापडला आहे. जानेवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची िनयुक्ती झाल्यानंतर नगर जिल्हा भाजपजिल्‍हाध्यक्षांची नियुक्ती केली करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार व एक खासदार आहे. जिल्हाध्यक्षपद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त आहे.
लोकसभानिवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून नाराज झालेले अॅड. प्रताप ढाकणे यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावरजिल्‍हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ढाकणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र, तो अयशस्वी झाला होता. लोकसभा निवडणुकीपासूनरिक्त असलेलेजिल्‍हाध्यक्षपदविधानसभानिवडणुकीतहीरिक्तच होते. जिल्ह्यात सध्या खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे,शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे व स्नेहलता कोल्हे असे सहा लोकप्रतिनिधी जिल्ह्यात आहेत, तरी भाजपलाजिल्‍हाध्यक्षपद देता आले नाही. या पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, एका गटाचा कदम यांच्या नावाला विरोध झाल्याने नावाची घोषणा रखडली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी अभय आगरकर हे इच्छुक आहे.
आगरकर यांनीविधानसभानिवडणुकीत मोठे मताधिक्य घेतल्याने त्यांची या पदावर वर्णी लागेल, अशी शक्यता असली, तरी आगरकर यांच्याकडे सध्या शहराचा पदभार आहे. जिल्हाध्यक्षपद हे ग्रामीण भागाला द्यायचे की शहरी भागाला यावरून मतभेद असल्याने हीनिवड रखडल्याचे बोलले जात अाहे.
जिल्‍हाध्यक्षपदाबाबच चाचपणी करणार
-जानेवारी महिन्यात प्रदेशाध्यक्षांचीनिवड केली जाणार आहे. यानिवडीनंतर लगेचच नगर जिल्‍हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी लवकरच नगर जिल्ह्यात येऊनजिल्‍हाध्यक्षपदाबाबच चाचपणी करण्यात येणार आहे.”विठ्ठल चाटे, संघटनमंत्री, भाजप