आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री शिंदे यांच्यावर भाजप कार्यकर्तेच नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सत्तेत नसताना कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात रमणारे सहज कार्यकर्त्यांना भेटणारे कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे मंत्री झाल्यापासून चार हात दूर गेल्याची भावना सध्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अाहे. मंत्री झाल्यापासून राम शिंदे यांच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते कमी आणि चमकोगिरी करणाऱ्यांची गर्दी वाढल्याने त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर ‘भाजपचा राम गेला कुणीकडे’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

साडेतीन वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर हेल्मेट घालून थेट मोटारसायकलीवर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आंदोलन करणारे कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे गेल्या दोन वर्षांपासून मात्र भाजपच्याच कार्यकर्त्यांपासून चार हात लांब रहात आहेत. ज्या पक्षाचा पाया कार्यकर्ता आहे, त्याच पक्षाचे कार्यकर्ते शिंदे यांच्यापासून दुरावत चालले आहेत. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, मात्र जे दररोज मंत्रालयात जाऊन चमकोगिरी करतात, त्यांची कामे सहज होतात, अशी भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांची आेरड आहे.

महिन्यातील चार-पाच दिवस वगळता उर्वरित काळ मंत्री शिंदे मुंबईतच असतात. मुंबईतही त्यांच्या कार्यालयात निवासस्थानी नेहमीच गर्दी असते. मुंबईत काम घेऊन गेल्यानंतर कार्यकर्त्यांना ते भेटतील, याची शाश्वती नसते. त्यामुळे काम होईल, या अपेक्षेने मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. शिंदे नगरला आल्यानंतर शासकीय विश्रामगृहावरील त्यांच्या दरबारात त्यांच्याभोवती नवख्यांना मानसन्मान मिळतो. मात्र, पक्षातील निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

भाजपतील कार्यकर्ते नाराज असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांची मंत्री शिंदे यांच्याकडील कामे मात्र सहज होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बरे होते असे म्हणू लागले आहेत. एकीकडे पक्षाचे कार्यकर्ते शिंदे यांच्यापासून दूर जात असताना दुसरीकडे शिंदे यांना मात्र कॅबिनेटचे वेध लागले आहेत. कार्यकर्त्यांसाठी ज्यांच्याकडे वेळ नाही, ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर कार्यकर्ते पक्षाला किती वेळ देतील, याबाबत कार्यकर्ते साशंक आहेत. तीन महिन्यांपूर्वी शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीच्या अपयशाचा अहवालही त्यांच्या पक्षातील विरोधकांनी तयार केला आहे.
पुढे वाचा...
> काँग्रेस नेत्यांच्या शब्दांना किमत
> आता वेळेची मर्यादा आली ....
बातम्या आणखी आहेत...