आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कदम यांच्या नावाला गांधी गटाकडून विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, त्यांच्या नावाला खासदार दिलीप गांधी गटाकडून विरोध होत असल्याने निवड रखडली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या जलि्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अ‍ॅड. प्रताप ढाकणे राष्ट्रवादीत दाखल झाले. या घटनेला पाच महिने झाले, तरी भाजपला अजूनही जलि्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळालेले नाही. जिल्‍हाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अशोक गर्जे, अ‍ॅड. दिनकर पालवे यांची नावे चर्चेत होती.
जिल्हाध्यक्षाविना लोकसभा निवडणूक लढवणा-या भाजपला विधानसभा निवडणूक जवळ आली, तरी सक्षम जिल्‍हाध्यक्ष मिमळालेला नाही. या पदासाठी चंद्रशेखर कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. कदम हे देवळाली प्रवराचे म्हणजे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या राहुरी मतदारसंघातील असून, कर्डिले त्यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र, कदम यांना गांधी गटाचा विरोध आहे. पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमांना किंवा आंदोलनांना कदम उपस्थित नसतात, तसेच गेल्या काही वर्षांपासून कदम यांचा संपर्क कमी झाला आहे, या मुद्यावर गांधी गटाचा त्यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे जिल्‍हाध्यक्षाची निवड रखडली आहे.