आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP's Nagar District President Name Very Soon Declare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप जिल्हाध्यक्षाची घोषणा लवकरच होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांतच नगर जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी दिली. शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजपच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्याला देण्यात आलेले सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळेल. जिल्हा भाजपला लवकरच जिल्हाध्यक्ष मिळेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री एकनाथ खडसे यांनीही शनिवारी रात्री नगरला धावती भेट दिली.