आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरात ग्रामसेवकांची बंदद्वार बैठक गाजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - दांडी बहाद्दर ग्रामसेवकांना नोटिसा बजावून किंवा बिनपगारी रजेसारखी शिक्षा करूनही ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे हतबल झालेले गटविकास अधिकारी एकनाथ साळुंके यांनी शक्कल लढवून गुरुवारी तालुक्यातील ग्रामसेवकांची बंदद्वार बैठक घेतली. या बैठकीबाबत पंचायत समिती परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.

तालुक्यात अनेक वर्षे झाल्याने ग्रामसेवकांची मुजोरी वाढली आहे. नव्याने आलेल्या ग्रामसेवकांनीही आधीपासून असलेल्या ग्रामसेवकांच्या वागण्यातून धडे घेत अल्पावधीतच त्यांचीही मुजोरी वाढली आहे. याबाबत सूचना करूनही बहुतांश ग्रामसेवक बैठकीला उपस्थित राहत नाहीत. अनेक जण केवळ तोंड दाखवून काहीतरी बहाणा करून निघून जातात. त्यामुळे शासनाच्या विकासाच्या योजना ग्रामसेवकांना माहीत होत नसतात. पर्यायाने तालुक्यातील गावागावांतून तक्रारी वाढल्या आहेत.

गटविकास अधिकारी साळुंके यांनी प्रारंभी काही दांडीबहाद्दर ग्रामसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या. मात्र, त्याचा उपयोग होत नसल्याचे पाहून त्या दिवसाची बिनपगारी रजा टाकायला सुरुवात केली. परंतु, त्याचाही उपयोग होत नसल्याने हतबल झालेल्या साळुंके यांनी गुरुवारी ग्रामसेवक बैठकीसाठी सभागृहात येताच सभागृहाचे सर्व दरवाजे बंद केले. दरवाजे बंद केल्याने चुळबूळ वाढली असली तरी, प्रारंभीपासून ते बैठक संपेपर्यंत ग्रामसेवकांची उपस्थिती चांगली राहिली.

जबाबदारीचे भान राहिलेले नाही
ग्रामसेवकांना जबाबदारीचे भान राहिलेले नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून आधी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या नंतर बिनपगारी रजा टाकून पाहिली. मात्र, तरीही उपयोग होत नसल्याचे पाहून अखेर तोंड दाखवून दांडी मारणा ग्रामसेवकांसाठी बंदद्वार बैठक घेण्याचा निर्णय घेतला. एकनाथ साळुंके, गटविकास अधिकारी, जामनेर

विविध कामांचा आढावा
पंचायतसमितीत गुरुवारी झालेल्या या बैठकीत ‘जलयुक्त शिवार’मधील विहीर पुनर्भरणाची कामे, वृक्षलागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे यासह शासनाच्या विविध योजनांचा गटविकास अधिकारी एकनाथ साळुंके विस्तार अधिकांनी आढावा घेतला.
बातम्या आणखी आहेत...