आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blood Bags And Platelets Issue In Nagar District

गैरसोय : नगर जिल्ह्यात रक्तपिशव्या, प्लेटलेट्सचा तुटवडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - डेंग्यूच्या वाढत्या थैमानामुळे जिल्ह्यात प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. दुसरीकडे सण व सुट्यांमुळे रक्तपिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्लेटलेट्सची वाढती मागणी पूर्ण करण्यात रक्तपेढ्या कमी पडत असून रक्तदात्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शहरातील सर्वच रक्तपेढ्यांनी केले आहे. दरम्यान, प्लेटलेटसंदर्भात गैरसमज पसरवून रुग्णांना लुबाडण्याचे प्रकारही होत आहेत.

डेंग्यूने मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात थैमान घाaतले आहे. तत्पूर्वी काविळीच्या साथीने कहर केला होता. डेंग्यूच्या संशयाने दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून प्लेटलेटस्ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्लेटलेटस् उपलब्ध असणाऱ्या केवळ चार रक्तपेढ्या शहरात आहेत. त्यातही जनकल्याण, अष्टविनायक व आनंदऋषीजी रक्तपेढीत प्लेटलेटस् मिळण्याची सुविधा आहे. विखे पाटील रक्तपेढीत गरजेनुसार प्लेटलेटस् तयार करून पुरवठा केला जातो. महापालिका व जिल्हा रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांकडे रक्तातून प्लेटलेट वेगळ्या करून त्या साठवण्याची व्यवस्थाच नाही.

दिवाळीचा सण व सुट्यांमुळे गेल्या महिनाभरात रक्तदान शिबिरे कमी झाली. नेमक्या याच कालावधीत प्लेटलेटसची मागणी वाढली. प्लेटलेटस् पाच दिवस सुरक्षितपणे साठवून ठेवता येतात. त्यामुळे रक्तदात्यांचा सातत्यपूर्ण ओघच प्लेटलेटसची गरज भागवू शकतो. जनकल्याण रक्तपेढीकडे गेल्या महिनाभरात ५०० जणांकडून प्लेटलेटस््ची मागणी झाली. त्यातील २७५ जणांना प्लेटलेटस् उपलब्ध करून देता आले.

रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटसचे प्रमाण २० हजारांच्या खाली आल्यास प्लेटलेटस् देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. डेंग्यूने भयग्रस्त झालेले नातेवाईक कोणत्याही परिस्थितीत व किंमतीत प्लेटलेटस् उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करतात. रुग्णाला सिंगल डोनर प्लेटलेट देण्यासाठी नऊ ते साडेनऊ हजार रुपये खर्च होतो. रॅण्डम डोनर पद्धतीत हाच खर्च चारशे ते सहाशे रुपयांपर्यंत खाली येतो. रुग्णांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन लुबाडणूक होत असल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. शासकीय यंत्रणांकडून जनजागृतीची आवश्यकता होती. प्लेटलेटस् देण्यासंदर्भात जनजागृती व नियंत्रण ठेवण्याकडे आरोग्य यंत्रणांनी दुर्लक्ष केले.

ग्रामीण रुग्णांकडून मागणी
- किमान दहा रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केल्यास प्लेटलेटची गरज भागवता येणे शक्य आहे. डेंग्यूमुळे प्लेटलेटसची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ८० टक्के तर शहरी भागातील २० टक्के रुग्णांकडून प्लेटलेटसची मागणी होते. एसएमएस व आॅनकॉल रक्तदात्यांमुळे प्लेटलेटसची गरज थोड्याफार प्रमाणात पूर्ण करणे शक्य झाले.'' मुकेश साठ्ये, प्रशासकीय अधिकारी, जनकल्याण रक्तपेढी

६५ पिशव्या पुरवल्या
- मागील महिन्यात ९० ते ९५ रक्त पिशव्यांची मागणी होती. ६५ पिशव्या पुरवता आल्या. डॉ. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची मागणी अधिक असते. महिलांमध्ये रक्ताची कमतरता असल्याने देशपांडे रुग्णालयाला रक्त पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येते.'' डॉ. रुपाली कुलकर्णी, प्रमुख, महापालिका रक्तपेढी

२०० रुग्णांना लाभ

सिंगल डोनर प्लेटलेट तंत्राद्वारे गेल्या महिन्यात डेंग्यूच्या २०० रुग्णांना लाभ देण्यात आला. या तंत्राद्वारे दीड तासात रक्तातून ऑनलाईन प्लेटलेटस काढल्या जातात व लाल पेशी, प्लाझ्मा रक्तदात्याच्या रक्तात परत केल्या जातात.'' डॉ. रवींद्र पाटणकर, संचालक, अष्टविनायक ब्लड बँक.
प्लेटलेट्सबाबत गैरसमज
परवानगी नाही
^ जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी सध्या स्थित्यंतरातून जात आहे. लवकरच रक्तपेढीला मेट्रो रक्तपेढीचे स्वरुप प्राप्त होणार आहे. वरिष्ठ स्तरावरून रक्तघटक वेगळे करून ठेवण्याची परवानगी नाही. सिव्हील व शासकीय रुग्णालयांकडून होणाऱ्या रक्ताच्या मागणीची पूर्तता करण्यात येते.''
डॉ. व्ही. एम. सिंगारे, रक्तसंक्रमण अधिकारी.

मागणी आल्यास पुरवठा
- प्लेटलेटस् पाचच दिवस टिकू शकतात. त्यामुळे मागणी आल्यास तयार करून त्यांचा पुरवठा केला जातो. सध्या आमच्याकडे प्लेटलेटसची मागणी नाही. ऐच्छिक रक्तदात्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने गरज तातडीने पूर्ण करता येणे शक्य आहे.'' राजेंद्र सूर्यनारायण, टेक्निकल सुपरवायजर, विखे रक्तपेढी.

काविळीच्या साथीचा फटका
काविळीच्या साथीमुळेही रक्तदात्यांमध्ये घट झाली आहे. काविळीच्या साथीतून गेलेल्या रक्तदात्यांना किमान सहा महिने रक्तदान करता येत नाही. डेग्यूच्या साथीमुळे सध्या प्लेटलेटसची मागणी वाढली आहे.'' सुनील महानोर, पीआरओ, आनंदऋषीजी हॉस्पिटल.

आयएमएने बैठक घ्यावी
प्लेटलेटसची संख्या एक लाख जरी असली, तरी काहीजण रक्तपेढीकडे प्लेटलेटस् मागतात. वास्तविक दहा हजारांच्या खाली प्रमाण गेले, तरच प्लेटलेटस देण्याची आवश्यकता असते. यासंदर्भात डॉक्टरांनी योग्य सल्ला देणे आवश्यक आहे. आयएमएने बैठक घेऊन यासंदर्भात जागृती करण्याची मोहीम हाती घ्यावी.'' अनिल कवडे, जिल्हाधिकारी.