आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे युवकांनी केले रक्तदान,भारत भारती संघटना जैन ओसवाल युवक संघाचा संयुक्त उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अलीकडच्या काळात रक्तदान, नेत्रदान, अवयवदान मरणोत्तर देहदानाचे महत्त्व वाढले आहे.अवयवदान करणे ही आपली पुरातन संस्कृती आहे. दधिची ऋषींनी आपल्या छातीच्या अस्थींचे वज्र अस्त्रासाठी दान केले होते. रक्तदानासाठी आता मोठी सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. भारत भारती जैन ओसवाल युवक संघाने रक्तदानासाठी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव यांनी बुधवारी केले.
भारत भारती जैन ओसवाल युवक संघाच्या संयुक्त विद्यमाने भगतसिंग जयंतीचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी भारत भारतीचे अध्यक्ष अशोक मवाळ, जैन ओसवाल संघाचे अध्यक्ष सचिन डुंगरवाल, उपक्रमप्रमुख समीर बोरा आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

डुंगरवाल म्हणाले, सध्या रक्तदानाइतकीच अवयवदानाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत प्रचार प्रसारासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. जैन ओसवाल युवक संघ आज विविध क्षेत्रांत सामाजिक काम करत आहे. आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून भारती भारतीचे सदस्य जैन ओसवाल संघाचे युवक अशा ५०० जणांनी रक्तदान केले.

प्रास्तविकात भारत भारतीचे अध्यक्ष अशोक मवाळ यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन संघटना करत आहे. दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी जैन ओसवाल युवक संघाची साथ या उपक्रमाला लाभली.

भारत भारतीचे कॅप्टन आनंदसिंग रावत, विश्वनाथ पोंदे, राजेश बन्सल, वाल्मिक कुलकर्णी, सुरेश रुणवाल, हिरालाल पटेल, जैन ओसवाल युवक संघाचे मनीष बोरा, अभय लुणिया, प्रमोद डागा, अमोल लुणिया यावेळी उपस्थित होते. भारत भारती संघटनेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. या उपक्रमात शहरातील विविध प्रांतातील नागरिक सहभागी होतात.
सूत्रसंचालन महेश भळगट यांनी केले, तर आभार समीर बोरा यांनी मानले. जनकल्याण, अष्टविनायक ब्लडबँक, आनंदऋषीजी ब्लडबँक अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले.

भारत भारती जैन ओसवाल युवक संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद््घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
बातम्या आणखी आहेत...