आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदानाने साजरा करा वाढदिवस..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विविध कारणांमुळे सध्या रक्ताची गरज मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान करावे, असे आवाहन एल अँड टीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी गुरुवारी केले.
(कै.) अनुपम राजकुमार दिवाण याच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त र्शीमहालक्ष्मी मल्टिस्टेट व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील शुभमंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पारगावकर बोलत होते. या वेळी डॉ. रवींद्र साताळकर, दिलीप कर्नावट, अशोक मवाळ, संजय खोंडे, प्रकाश बच्छावत, देवेंद्रसिंग वधवा, अशोक मवाळ, अर्पण रक्तपेढीचे डॉ. चेतन गुगळे, महापालिका रक्तपेढीच्या वैशाली कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पारगावकर म्हणाले, रक्तदान शिबिर भरवणे हे आता मोठय़ा जिकिरीचे काम आहे. हे सामाजिक कार्य दिवाण परिवार मागील दहा वर्षांपासून निष्ठेने करत आहे, हे कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे. आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा. तसे केल्यास सामाजिक पुण्य पदरी पडेल. अर्पण रक्तपेढी व महापालिकेच्या रक्तपेढीने रक्तसंकलन केले. शिबिरात 135 बॅगा रक्त संकलित करण्यात आले.