आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीए असोसिएशनच्या शिबिरात ३०० रक्त बाटल्यांचे संकलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चांगलासंदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल चांगला आदर्श निर्माण करावयाचा असेल, तर स्वत:चा सहभाग महत्त्वाचा हे ओळखून प्राप्तीकर विभागाचे सहायक आयुक्त सुरेंद्रकुमार अगल यांनी स्वत: रक्तदान करून नगरच्या सीए असोसिएशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास प्रारंभ केला. दिवसभरात या शिबिरात ३०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त झेंडावंदन, तसेच रक्तदान शिबिर नगर शाखा श्रीरामपूर या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले. नगरच्या शिबिराचे उद्घाटन सुरेंद्रकुमार अगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीए यू. एस. कदम, संजय देशमुख, सीए अजय गुजर, अहमदनगर सीए असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद जांगडा, उपाध्यक्ष पारस छल्लानी, सचिव सुशील जैन, खजिनदार प्रसाद भंडारे, संस्थापक अध्यक्ष मोहन बरमेचा, ज्ञानेश कुलकर्णी, परेश बोरा, माजी अध्यक्ष सीए अजय मुथा मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सीए असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.

आनंदऋषी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात ४५० रक्तपिशव्या संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे सचिव सुशील जैन यांनी सांगितले. ज्ञानेश कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सदस्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.