आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार थोरातांचा अंगरक्षक निलंबित, मोदी सरकारच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मोदी सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा ठपका ठेवत आमदार बाळासाहेब थोरात यांचा अंगरक्षक असलेल्या पोलिसाला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी ही कारवाई केली. रमेश शिंदे असे या पोलिसाचे नाव असून तो गेल्या ३-४ वर्षांपासून थोरात यांचा अंगरक्षक आहे. 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. सरकारच्या या धाेरणाच्या विरोधात टीकेची मोठी झोड उठली आहे. मोदी सरकारविराेधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसावर निलंबनाची कारवाईची घटना प्रथमच नगर जिल्ह्यात घडली. काँग्रेसचे नेते थोरात यांचा गेल्या तीन ते चार वर्षांपासून अंगरक्षक असलेल्या शिंंदे यांनी सोशल मीडियावरील मोदी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट काही व्हॉटस्अॅप ग्रूपवर पाठवली होती. ही पोस्ट अनेक ग्रूपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. 

पंतप्रधान कार्यालयाकडेदेखील तक्रार करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी शिंदे यांच्या पोस्टबाबत चौकशी केली. त्यांच्याच मोबाइलवरून ही पोस्ट व्हायरल झाल्याचा अहवाल सायबर विभागाने पोलिस अधीक्षक शर्मा यांना दिला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...