आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी आणखी एका मध्यस्थाला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिक्षकांना अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे पुरवणार्‍या आणखी एका मध्यस्थाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. नितीन नारायण आंधळे (31, कर्जुलेहर्या, ता. पारनेर) असे त्याचे नाव असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी त्याला दोन दिवस पोलिस कोठडी दिली.

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी 76 प्राथमिक शिक्षकांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अटकेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यस्थांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून आरोपींची संख्या आता 92 च्या पुढे गेली आहे. बुधवारी आंधळेला अटक करण्यात आली. बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्याने कुणाची मदत घेतली आहे, स्वाक्षरी व शिक्के यांची माहिती घ्यावयाची आहे, हस्ताक्षराचे नमुने घ्यायचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.