आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट अपंग प्रकरण: आणखी 6 शिक्षक न्यायालयीन कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी 6 शिक्षकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिता गिरडकर यांनी शुक्रवारी हे आदेश दिले. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर 17 शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने या शिक्षकांना 15 जानेवारीपर्यंत तपासी अधिकारी किंवा संबंधित न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही शिक्षक न्यायालयासमोर हजर झाले. त्यापैकी संगीता टोणपे, सरला गावडे, सुवर्णा मोहोळकर, वैशाली लोंढे, रोहिणी ढोमे व गोरक्ष धस यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून त्यात काही दलाल अडकले असल्याचा संशय आहे. त्यामुळे गुन्ह्याचा सखोल तपास करण्याकरिता त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिस व सरकार पक्षातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने सहाही शिक्षकांना न्यायालयीन कोठडी सुनावली.