आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट अपंग प्रमाणपत्र; आठ शिक्षकांना कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी आठ शिक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी सोमवारी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील 76 शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र दिले होते. 57 शिक्षक सध्या जामिनावर सुटले आहेत. अन्य सात शिक्षक सोमवारी पोलिसांसमोर, तर एक शिक्षिका न्यायालयात हजर झाली. पोलिसांनी त्यांना न्यायाधीश इंदलकर यांच्यासमोर हजर केले. इतर शिक्षकांना अटक होऊन त्यांना जामीन मंजूर झाला. अटक केलेल्या शिक्षकांना पोलिस कोठडीची गरज नसल्याचे म्हणणे आरोपींच्या वतीने मांडण्यात आले.

कोठडी मिळालेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे - रावसाहेब यादव औटी, रामदास भगवान शिंदे, तानाजी किसन गोडे, हेमंत र्शावण वाघमारे, अब्दुल अहमद गफ्फार शेख, संजय पोपट घोडके, सुरेश नवले व रजनी दत्तात्रय वाहुत्रे.