आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Handicap Certificate Issue At Ahmednagar Zilha Parishad

अहमदनगर- तीन मध्यस्थासह एका शिक्षकाला पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी तीन मध्यस्थांसह एका शिक्षकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी सोमवारी 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी 76 शिक्षकांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटक केलेल्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या 92 वर पोहोचली आहे. बनावट प्रमाणपत्र मिळवून देणारे मध्यस्थ भिमाबाई विठ्ठल शिर्के (कर्जुले हर्या), शिवाजी गंगाराम हुलावळे (खडकवाडी), सोमनाथ मारुती अरण्ये (पुणेवाडी) व शिक्षक सुहास नामदेव वाकळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्र कोणाकडून बनवून घेतली, ही प्रमाणपत्र बनवण्यासाठी वापरण्यात आलेले शिक्के हस्तगत करणे, स्वाक्षरी कोणाची केली याबाबत तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली. न्या. इंदलकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना पोलिस कोठडी दिली.