आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस बियाणे व कंपन्या बीटी काॅटन राज्यातून हद्दपार करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्या बीटी काॅटन महाराष्ट्रातून हद्दपार करू, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित इंडो इस्राइल कृषी प्रकल्पांतर्गत डाळिंब गुणवत्ता केंद्र आणि राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, प्रकाश गजभिये, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा, डेव्हिड असाव, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे, सदा देवगावकर अादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फुंडकर म्हणाले, बीटी आपल्या छातीवर बसले. परदेशातून मान्टोसो केव्हाच हद्दपार झाले आहे. त्यांनी येथील शेतकऱ्यांचे रक्त शोषले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच परदेशी कंपनीचे बियाणे तडीपार करावे.

कृषी विद्यापीठांनी देशी वाणावर अधिकाधिक संशोधन करणे गरजेचे आहे, असे सांगून फुंडकर म्हणाले, बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी येतात. बीटीने मोठे नुकसान केले आहे. बोगस बियाणे बाजारात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हवामान बदलाचा विपरित परिणाम शेतीवर झाला अाहे. कमी पाणी, कमी अवधीत उत्पन्न देणारे वाण विकसित होणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेचा शेतीसाठी फायदा झाला आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) राज्यातील चार कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रोखली आहे. विद्यापीठात पुरेशी नोकर भरती नसल्याने खासगी कृषी महाविद्यालयांच्या दर्जाबाबत राज्य सरकारने विद्यापीठाच्या नोकर भरतीसाठी परवानगी दिली आहे. लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील १५३ खासगी कृषी महाविद्यालयांच्या फेरतपासणीचे आदेश देण्यात आले अाहेत. दोषी कृषी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात येईल. तेथे शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा खेळ करू नका. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा, असे फुंडकर यावेळी म्हणाले.

आठवडाभरात कृषी अधीक्षकाची नियुक्ती
नगर येथील जिल्हा कृषी अधीक्षकाच्या रिक्त जागेबाबत मुंबईतील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी साेमवारी सांगितले. पालकमंत्री राम शिंदे यांच्या नगर येथील कार्यालयाला दिलेल्या भेटीच्या वेळी ते बोलत होते. आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा कृषी अधीक्षकपद रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर फुंडकर यांनी आठवडाभरात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. रब्बीचे, तसेच शेडनेट, पॉलिहाऊस, कांदाचाळ यांचे अनुदान देण्याचे त्यांनी यावेळी निर्देश दिले.
बातम्या आणखी आहेत...