आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैलानीबाबांचे दर्शन राहिले अधुरे, जीप- ट्रकच्या धडकेत 7 भाविक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद -नगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारात बोलेरो जीप व ट्रकच्या भीषण अपघातानंतर बाेलेराे जीपची अशी अवस्था झाली हाेती. - Divya Marathi
आैरंगाबाद -नगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारात बोलेरो जीप व ट्रकच्या भीषण अपघातानंतर बाेलेराे जीपची अशी अवस्था झाली हाेती.
अहमदनगर- बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या सैलानीबाबांच्या दर्शनासाठी निघालेले ७ भाविक बोलेरो जीप व ट्रक अपघातात जागीच ठार झाले. हा भीषण अपघात नगर-आैरंगाबाद महामार्गावरील धनगरवाडी शिवारात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. सर्व मृत दौंड तालुक्यातील (जि. पुणे) यवतचे रहिवासी होते. जेऊर टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात बोलेरोचा (एमएच १२ एफएफ ३३९२) अक्षरश: चक्काचूर झाला.
 
मृतांत अंकुश दिनकर नेमाने (४५, माळशिरस, ता. पुरंदर), मनोहर रामभाऊ गायकवाड (४५), मुबारक अबनास तांबोळी (५२), बाळू किसन चव्हाण (५०), स्वप्नील बाळू चव्हाण (१७), गोकुळ रामभाऊ गायकवाड (४०) व अरुण पांडुरंग शिंदे (सर्व यवत, ता. दौंड, जि. पुणे) यांचा समावेश आहे. त्यापैकी दोघेजण सख्खे भाऊ होते, तसेच बाप-लेकाचाही समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले अाहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी आले. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने या महामार्गाच्या एका बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली. नंतर क्रेनच्या मदतीने अडीच तास अंधारात शर्थीचे प्रयत्न करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पहाटे सर्व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.

असा झाला अपघात...
अपघातात मृत्यूमुखी पडलेले भाविक दौंड तालुक्यातील यवतचे रहिवासी होते. रात्री साडेअकराला कुटुंबियांचा निरोप घेऊन ते बाबांच्या दर्शनाला निघाले. धनगरवाडी शिवारात बोलेरो चालक दुभाजक ओलांडून यु-टर्न घेण्याच्या विचारात होता. त्याचवेळी समोरुन आलेल्या ट्रकची धडक बसली. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध हयगयीने वाहन चालवून अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.

पुढील स्लाइडवर पाहा... बोलेरो- ट्रकच्या अपघातील भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...