आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यनगरी पुस्तक प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुण्याच्या साहित्यनगरीतर्फे आयोजित मराठी व इंग्रजी पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन महावीर कलादालनात सुरू झाले आहे. एमपीएसस्सी, यूपीएसस्सी स्पर्धा परीक्षा, स्टडी सर्कल, के. सागर, युनिक अँकॅडमी डिक्शनरी या शैक्षणिक पुस्तकांसह एक लाखाहून अधिक प्रकारची पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध आहेत, अशी माहिती संयोजक शिवाजी व नवनाथ भांबड यांनी दिली.

या प्रदर्शनात वा. सी. बेंद्रे यांचे शिवचरित्राचे दोन भाग, अच्युत गोडबोले यांचे मनात, मुसाफीर, निखिल वागळे यांचे ग्रेट भेट, विश्वास पाटील यांचे पानिपत व झाडाझडती, मी अल्बर्ट एलिस, महानायक, माझी जन्मठेप, शहेनशहा, ययाती, दुर्योधन, डॉ. कलाम यांचे अग्निपंख, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप, शरलॉक होम्स, रॉबिन शर्मा यांची पुस्तके, चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉइंट सम वन, थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, वन नाईट कॉल सेंटर, रिव्हॉल्युशन या चार कादंबर्‍यांचे अनुवाद, कर्माचा सिद्धांत, महामानव, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबुराव अर्नाळकर यांची सर्व पुस्तके, गो. रा. खैरनार यांचे आत्मचरित्र यासह पाचामुखी, गाठोड, युगप्रवर्तक सयाजीराव गायकवाड, लसावी, राजे शहाजी, अंबानी अँड सन्स, युगान्त, अनुपम खेर यांचे चरित्र, गिरीश कर्नाड यांचे चरित्र, डोंगरी ते दुबई ही नवीन पुस्तके आहेत.

धार्मिक सण, उत्सवांसाठी चातुर्मास कहाणी संग्रह, ज्ञानेश्वरी, पुराणे, तसेच इतर धार्मिक ग्रंथ प्रदर्शनात उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी बाल साहित्य, बोधकथा, गोष्टींच्या पुस्तकांचा खजिना बघायला मिळेल, असे भांबड यांनी सांगितले.

पाककला, आरोग्य, धार्मिक, आरोग्य, शालेय, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यटन, भविष्य, विज्ञान, काव्य, संगीत, नाटक आदी पुस्तकांसह नामवंत लेखक पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, श, चेतन भगत, नारायण व्यास, सुधा मूर्ती यांचे गाजलेले ग्रंथ प्रदर्शनात आहेत. कायदेविषयक पुस्तकेही उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन सकाळी 9.30 ते रात्री 9 पर्यंत सुरू आहे.