आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy Point Out Finance Minister Behave To Prime Minister

अर्थमंत्र्यांच्या 'त्या' सवयीकडे मुलाने वेधले पंतप्रधानांचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली पाने उलटताना थुंकीचा वापर करत होते. त्यांच्या या सवयीकडे लक्ष वेधून अर्थमंत्र्यांना स्पंजचा वापर करण्याचा सल्ला द्यावा, असे पत्र नगरच्या निरल योगेश जाजू या मुलाने पंतप्रधानांना पाठवले आहे.

तक्षशिला स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या निरलने हिंदीत पत्रात म्हटले आहे, माझे आजोबा टीव्हीवर अर्थसंकल्प पहात होते. मी त्यांच्याबरोबर बसलो होतो. अर्थसंकल्पाची पाने उलटताना मंत्री थुंकी लावलेले बोट वापरत होते. ही वाईट सवय आहे, असे आम्हाला शाळेत शिकवले गेले. मी असे करू लागलो की आजोबा मला रागवत. मंत्र्यांची ही सवय पाहून मला वाईट वाटले. आपण त्यांना स्पंजचा वापर करण्याची सूचना द्यावी, अशी विनंती निरलने मोदी यांना केली आहे.