आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BPHE Coordination With North Karalino University

बीपीएचईचा नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाशी करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर-समाजकार्य आणि संशोधन क्षेत्रातील नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाशी डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेने (बीपीएचई) बुधवारी सामंजस्य करार केला. संस्थेचे फिलीप बार्नबस आणि विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे डीन डॉ. जॅक रिचमन यांच्यात झालेला हा करार पुढील पाच वर्षांसाठी आहे.
या सामंजस्य करारांतर्गत पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सीएसआरडीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एकत्रितरित्या संशोधन, तसेच विविध प्रकारच्या शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या प्रयत्नांमुळे या दोन देशांतील संस्था सहभागाने काम क रतील. त्यामुळे विविध अभ्यास क्षेत्रे विकसित होणार आहेत. या अभ्यासामुळे इतर देशांतील सामाजिक परिस्थिती व तिचे प्रश्न सोडवण्याच्या पध्दती यांचा अभ्यास करता येणार असून जगाकडे व अन्य देशांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात सकारात्मक बदल होणार आहे.
या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापक प्रमाणात शैक्षणिक आदान-प्रदान होणार आहे. दोन्ही देश एकत्र मिळून सामाजिक विषयांवर संशोधन करून ते प्रकाशित करतील. या आधी या विद्यापीठाने चीन, स्वीडन या देशांबरोबर करार केला आहे. भारतात पुणे येथील एमआयटी संस्थेनंतर बीपीएचई सोसायटी ही दुसरी संस्था आहे.