आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण समाजाने सोडली भाजपची साथ, शिवसेनेचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरपालिका, महापालिका, सहकारी बँका, पतसंस्था सर्वच निवडणुकांमध्ये भाजपने ब्राह्मण समाजाला डावलले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी मात्र ब्राह्मण समाजाला वेळोवेळी प्रतिनिधीत्व मिळवून दिले. त्यामुळे या निवडणुकीत ब्राह्मण समाज राठोड यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असा दावा शिवसेना पक्ष कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. महापालिकेचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
राठोड यांनी ब्राह्मण समाजाला वेळोवेळी बरोबर घेतले आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ब्राह्मण समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात आले. त्यामुळे ब्राह्मण समाजाने या निवडणुकीत भाजपची साथ सोडली आहे. भिंगार, केडगाव, सावेडी या उपनगरांसह मध्यवर्ती शहरातील विविध ब्राह्मण सेवा संघातर्फे बैठका घेऊन राठोड यांना पाठिंबा दिला. त्यासाठी नरेंद्र कुलकर्णी, भय्या गंधे, सुहास मुळे, चारू मुळे, पाठक गुरुजी, स्वामी मुळे, प्रा. मकरंद खेर, वाल्मिक कुलकर्णी, सचिन पारखी, शिरीष जानवे आदींनी पुढाकार घेतल्याचे पत्रकात म्हटले आहे. समाजातील बेरोजगारांना उद्योगधंदे सुरू करण्यास शिवसेना पाठबळ देणार आहे. आरक्षण नसल्याने समाजातील युवकांना व्यवसायाशिवाय पर्याय नाही. भांडवल नसल्याने युवकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. समाजाच्या उत्कर्षासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.