आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brahmin Federation News In Marathi, Divya Marahti

ब्राह्मण युवकांना आर्थिक भांडवल कर्जरूपाने द्या, ब्राह्मण महासंघाच्‍या उपाध्यक्षांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - आरक्षण अगोदरच ७2 टक्क्यांपर्यंत गेले असल्याने आम्हाला आरक्षण नको. ब्राह्मण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी स्वतंत्र महामंडळ करून आर्थिक भांडवल कर्ज रूपाने द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नीळकंठ देशमुख व जिल्हाध्यक्ष मधुसूदन मुळे यांनी केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पारनेर तालुक्याचा मेळावा रविवारी सुपा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ब्राह्मण समाजाचा सध्या झालेल्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, पण आता यात नव्याने कोणाचा समावेश होऊ नये. कारण आरक्षण ७2 टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्याचा इतरांना फायदा होणार नाही.

मुळे म्हणाले, ब्राह्मण समाजाला अनेकजण उच्चवर्णीय समजत असले, तरी अनेक भागात ब्राह्मण आर्थिकदृष्ट्या मागासलेले व केवळ भिक्षुकीवर अवलंबून आहेत. मग त्यांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणार नसेल, तर उद्योगांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून द्यावे. डॉ. सुनील गंधे म्हणाले, आमचा आरक्षणापेक्षा गुणवत्तेवर विश्वास आहे. त्यासाठी स्वत:च्या गुणवत्तेवर व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे. यावेळी अर्पिता पोळ, वैष्णवी जोशी, प्रियंका क्षीरसागर, गौरी देशपांडे, अनिरुद्ध महाजन, अतुल कुलकर्णी, मानसी भालेराव, ऋषिकेश कलवडे व प्रियंका ठोंबरे या गुणवंतांचा महासंघातर्फे गौरव करण्यात आला. डॉ. गंधे, संयोजक विलास काळे, जिल्हा महासचिव डी. एस. कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, कन्हैया व्यास, चंद्रकांत महाजन, तालुकाध्यक्ष शशिकांत जोजार, उपाध्यक्ष गणेश कुलकर्णी, सचिन बडवे, पोपट देशपांडे, विवेक काळे, श्यामराव काळे आदी यावेळी उपस्थित होते. महेश पोळ यांनी वेदमंत्र पठण केले, तर सूत्रसंचालन सुरेश क्षीरसागर यांनी केले.