आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अहमदनगर MIDC ला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन पुन्‍हा फुटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- मुळा धरणातून अहमदनगरमधील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आज पुन्हा फुटली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. सकाळी 11 वाजता ही पाइपलाइन फुटली. तर, शनिवारी सकाळीही ही पाइपलाइन फुटली होती. त्‍यामुळे दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाण्‍याची नासाडी झाली आहे.
- शनिवारी नगर तालुक्यातील विळद जवळ पाइपलाइन फुटल्‍याने रेल्‍वे ट्रॅक खचला होता.
- मुळा धरणातून नगर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी ही पाइपलाइन आहे.
- यामुळे पाइपलाइनजवळून जाणारा रेल्वे ट्रॅक खचला होता.
- परिणामी रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती.
- ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच मनमाडकडून येणारी रेल्वे थांबविण्यात आली होती.
- रविवारीही पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले.
- परिसरातील शेतात हे पाणी साचले आहे. दोन्ही बाजूंचे ओढेही भरुन वाहताहेत.
- फुटलेली पाइपलाइन पाहण्‍यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
सर्व छायाचित्र- मंदार साबळे
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पाइपलाइन फुटल्‍याने असे वाहत होते पाणी..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...