आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Bomb Found At Shrigonda Tahasil, News In Marathi

श्रीगोंदा तालुक्यात सापडले ब्रिटिशकालीन तोफगोळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी साखर कारखान्याजवळ जमिनीचे सपाटीकरण करताना ब्रिटिशकालीन तोफगोळे असलेली पेटी आढळली आहे.
येथील कोळगाव हद्दीत प्रशांत शिवाजी वाबळे यांची जमीन आहे. यंत्राच्या साहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी जमिनीखाली एक जुनी पेटी सापडली. पेटीत नेमके काय असेल याची शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाबळे यांच्या शेतात जाऊन ती पेटी उघडली असता आत तोफगोळे आढळून आले.

या तोफगोळ्यांवर 1942 असे लिहिलेले आहे. त्यामुळे हे तोफगोळे इंग्रजांच्या काळातील असावे असा निष्कर्ष काढला जातोय. या भागात पूर्वी इंग्रज सैन्य गोळीबाराचा सराव करत असे. विसापूर परिसरात काही क्रांतिकारक कार्यरत होते. त्यांनी ब्रिटिशांच्या कोठारातून दारूगोळा पळवून हा साठा येथे लपवला असावा, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तोफगोळे सापडल्याचे वृत्त या भागात वेगाने पसरले. त्यामुळे लोकांनी ते बघण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, एटीएसचे पथक दाखल...