आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Colombia University's Aleared Prize Awarded To Anna Hazare

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचा ‘अलार्ड प्राईज' पुरस्कार अण्‍णा हजारे यांना प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने यंदापासून सुरू केलेला ‘अलार्ड प्राईज 2013’ हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी (25 सप्टेंबर) रोजी प्रदान करण्यात आला. एक लाख कॅनेडियन डॉलर व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हजारे यांना आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये हा सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने हजारे यांच्यासह बांगलादेशातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ़ सीमा समर व लंडनच्या ग्लोबल विटनेस या समाजसेवी संस्थेची या पुरस्कारांसाठी निवड केली होती. हजारे यांना एक लाख डॉलरचा प्रथम, समर व ग्लोबल विटनेस या संस्थेस अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी 25 हजार कॅनेडियन डॉलरच्या पुरस्कार दिला.