आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 हजार कृषीपंप ग्राहकांची वीज पुरवठा तोडला, साडेचार हजार ग्राहकांनी भरले पावणेदोन कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडे असलेली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने गेल्या आठवड्यात सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ६१ हजार कृषिपंप ग्राहकांची वीज तोडली आहे. साडेचार हजार कृषिपंप ग्राहकांनी भरले पावणेदोन कोटींची थकबाकी भरली आहे.
 
थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे. चालू बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना व्याज दंड माफ करून मूळ थकबाकीची रक्कम पाच सामान हप्त्यात भरण्याची सुविधा यातून मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तोपर्यंत चालू वीजबिल भरणे आवश्यक आहे. 
 
जिल्ह्यातील सुमारे लाख ५७ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास हजार २८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत आकारण्यात आलेले चालू बिल (देयक) म्हणजेच दोन त्रैमासिक बिले भरणाऱ्या कृषिपंपाची वीज खंडित करण्याची निर्णय महावितरणकडून गेल्या आठवड्यात घेण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील लाख ५७ हजार ग्राहकांकडे २२८५ कोटी थकीत असून ३५ कोटी ५६ लाख रुपयांची चालू वीजबिले थकीत आहेत. महावितरणने या मोहिमेत ६१ हजारांपेक्षा अधिक कृषिपंप ग्राहकांची वीज तोडली आहे. 

वसुली मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४३०० पेक्षा अधिक ग्राहकांनी त्यांच्या थकबाकीपोटी जवळपास कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. आता या ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून कृषिपंप ग्राहकांना थकीत बिलावरील व्याज दंड यात शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे. केवळ मूळ थकबाकी भरावयाची आहे. ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच सामान हप्ते पाडून देण्यात येणार आहे. दर तीन महिन्यांनी चालू बिलासोबत हप्त्याची रक्कम भरावी लागणार आहे, तर ३० हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्ते दर दीड महिन्यानी भरावे लागणार आहेत. 
 
१५ नोव्हेंबरपर्यंत वीज तोडणार नाही 
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. ३० ऑक्टोबरला कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत चालू बिल भरणे अनिवार्य करण्यात आले होते. आता ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सुविधा यातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांचा वीज तोडणार नाही. 
 
 
बातम्या आणखी आहेत...