आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राँग साईडने वाहने धावताहेत सुसाट, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाहनांची वाढती संख्या आणि तुलनेत पोलिसांचे अत्यल्प मनुष्यबळ यामुळे वाहतूक कोंडी वाढते आहेत. अरुंद रस्त्यावरून वाहन दामटवण्याची प्रत्येकालाच घाई असल्यामुळे ट्रॅफिक जामचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे कामही वाढले आहे. चौकातील वाहतूक व्यवस्था हाताळण्याबरोबरच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना त्यांचीही तारांबळ उडत आहे. काही रस्त्यांवर वाहने सर्रास राँग साईडने दामटवली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहन चालवताना अशिक्षित माणसांपेक्षाही वाईट वर्तन शहरातील सुजाण नागरिकांकडून होताना दिसते. लाल सिग्नल असताना थांबणे, हॉर्न वाजवून समोरच्या वाहनचालकास पुढे निघण्यास प्रवृत्त करणे, पिवळा दिवा लागलेला असताना आपले वाहन काढून घेण्याची घाई करणे, पांढऱ्या पट्ट्यापुढे वाहन नेऊन उभे करणे हे प्रकार तर नित्याचे झाले आहेत.

लांबचा वळसा टाळण्यासाठी अनेकजण राँग साईडने वाहन नेतात. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. शहरातील प्रेमदान चौक, पत्रकार चौक, पोलिस अधीक्षक चौक, कोठला परिसर, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, नगर काॅलेज, कोठी चौक, बाजार समिती चौक, इंपिरियल चौक, स्वस्तिक चौक आदी ठिकाणी हे चित्र सर्रास पहायला मिळते. तारकपूर रस्त्यावरही अनेदा दुचाकीचालक राँग साईडने वाहन दामटवतात. त्यामुळे पादचाऱ्यांनाही काळजीपूर्वक रस्त्याने चालावे लागते. या प्रकारांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयांजवळ, तर राँग साईडने वाहने दामटवण्याचे प्रकार सर्वाधिक आहे.
बहुतांश चौकांत वाहतूक पोलिस नसतात. ठरावीक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांच्या नियुक्त्या आहेत. त्यांच्या समोरून काहीजण राँग साईडने वाहने नेतात. गर्दीच्या वेळी असे प्रकार होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.

नगरच्या वाहनचालकांना शिस्त कशी लागणार ?
शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांतून ये-जा करणारे विद्यार्थी त्यांचे पालक बऱ्याचदा शॉर्टकटकरिता चुकीच्या दिशेने वाहने दामटवतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघाताला निमंत्रण मिळते. शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर एकेरी वाहतूक आहे. कापड बाजार, नवीपेठ आदी परिसरात एकेरी वाहतूक असूनही दुचाकी वाहनचालक सर्रास चुकीच्या दिशेने वाहने नेतात. अत्यल्प मनुष्यबळामुळे वाहतूक पोलिसांनी या रस्त्यांवर दिवसभर वाहतूक नियमन करणे शक्य नसते. त्यामुळे राँग साईडने वाहने दामटवणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याचे आव्हान कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...