आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीज साजरी करून गावी निघालेल्या भावाचा मृत्यू, खड्डयात दुचाकी आदळून अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी शहर - भाऊबीज करून व्यवसायाच्या गावी निघालेल्या भावाचा शनिवारी दुपारी अपघाती मृत्यू झाल्याने डुक्रेवाडी परिसरात शोककळा पसरली. नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरी काॅलेजसमोर शनिवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. विजय रंगनाथ डुक्रे (३० वर्षे, राहणार डुक्रेवाडी) हा तरूण सणासाठी आपल्या गावी आला होता. दुपारी राहुरी फॅक्टरीकडून राहुरीच्या दिशेने येत असताना नगर-मनमाड राज्यमार्गावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळून दुचाकी (एमएच १७, एवाय ९४२०) पुढे चाललेल्या वाहनावर जाऊन धडकली. हेल्मेट असूनही गंभीर जखमी झालेल्या विजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
या घटनेची खबर राहुरी पोलिसांना देण्यात आली, पण बराचवेळ कुणीही घटनास्थळी फिरकले नाही. अखेर रस्त्यावर जमलेल्या नागरिकांनी विजयचा मृतदेह रूग्णवाहिकेतून ग्रामीण रूग्णालयात आणला. ग्रामीण रूग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नातेवाईकांनी विजयचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने दोन वर्षांपूर्वी विजय जुन्नर येथे स्थायिक झाला होता. आम्लेट-पावचा छोटासा व्यवसाय करून आपली पत्नी दोन मुलांच्या पोटाची खळगी भरण्याचे काम या व्यवसायातून विजयने सुरू केले होते. दिवाळी भाऊबीजेसाठी डुक्रेवाडी या आपल्या गावी आलेल्या विजयवर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. 
बातम्या आणखी आहेत...