आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावानेच केला बहिणीचा खून; मुलीने भर ग्रामसभेत केला खुलासा, चौघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - खुनातील आरोपींना पकडावे, या मागणीसाठी आंबीजळगाव येथे ग्रामसभा सुरू असताना मृत महिलेच्या मुलीने थेट आरोपींची नावेच जाहीर केल्याने पोलिसांनी लोकांमध्ये बसलेल्या मृताच्या भावासह चार आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये मृत महिलेचा सख्खा भाऊ, भावजय दोन भाच्यांचा समावेश आहे. 
 
खातगावजवळील नदीत आंबीजळगाव येथील अलका दशरथ राऊत या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा खून जमिनीच्या वादातून जवळच्या नातेवाईकांनी केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिस गावात आल्याने या महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधत ग्रामस्थांनी आंबीजळगाव बंदची हाक देऊन ग्रामसभा आयोजित केली. बुधवारी सकाळपासून गावातील सर्व व्यवहार ठप्प होते. दरम्यान, अचानक नवनाथ फरांडे याने आपल्या घरून पोलिस पाटील बिभीषण अनारसे यांना फोन करून या खुनात सर्व ग्रामस्थ आमचेच नावे घेत आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 
 
पोलिस पाटील अनारसे यांनी त्वरित अजित अनारसे, अनिल अनारसे, दिलीप अनादरे, गोपाळ अनादरे, किशोर निकत, धनंजय निकत, योगेश अनारसे युवकांना बरोबर घेऊन त्वरित त्याच्या घरी जाऊन त्याला गावात आणले. दरम्यान, मुख्य चौकात नागरिकांनी ग्रामसभा सुरु केली. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत या खुनाचा पोलिसांनी त्वरित तपास लावत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मृत महिलेचे वडील जगन्नाथ फरांडे यांनी या खुनात घरातीलच व्यक्ती असल्याचे संकेत दिले होते. यानंतर मृत अलका राऊत हिच्या मुलीने ग्रामसभेत आरोपींची नावे जाहीर करून खुनाला वाचा फोडली. 

मृताचा सख्खा भाऊ बापू जगन्नाथ फरांडे, त्याची पत्नी विजयाबाई त्यांची दोन मुले नवनाथ गणेश यांनी आपल्या आईचा खून केल्याचे सांगितले.  बापू फरांडे त्याचा मुलगा नवनाथ ग्रामसभेत होते. ग्रामसभेत मृताच्या मुलीने नावे जाहीर करताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. मृताच्या दोन मुली सरपंच लोचनाबाई बापू अनारसे यांनी पोलिस निरीक्षक वसंत भोये उपनिरीक्षक शहादेव पालवे यांना निवेदन दिले. निवेदनाप्रमाणे पुढील तपास करून गुन्हेगारांना शासन होईल, असा विश्वास भोये यांनी नागरिकांना दिला. मृत अलका राऊत हिच्या अस्थी सिद्धटेक येथे तिच्या नातेवाईकानी नेल्या होत्या. विजयाबाई गणेश बापू फरांडे हेही अस्थी विसर्जनासाठी गेले होते. ते गावाकडे परतत असताना कर्जत येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...