आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कत्तलीसाठी आणलेल्या ६० जनावरांना जीवनदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - झेंडीगेट परिसरातील एका कत्तलखान्यात आणलेल्या ६० जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत सुमारे ७०० किलो मांस पोलिसांनी जप्त केले. बंगाली चौकात गुरुवारी रात्री साडेदहानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, शहर विभागाचे उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यात काही जनावरे आणण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. झेंडीगेट परिसरातील एका कत्तलखान्याजवळ या पथकाने सापळा रचला. संशयित जनावरांनी भरलेला ट्रक जवळ येताच पोलिसांनी ट्रक अडवून चालकाकडे चौकशी केली. ट्रकचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी ट्रकची तपासणी केली.

६० जनावरे मिळून आली. पोलिसांनी जनावरे, मांस आणि ट्रकसह सुमारे ११ लाख २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत. गुन्हे शाखेचे फौजदार संदीप शिंदे, सहायक फौजदार कृष्णा वाघमारे, कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, जाकीर शेख, बाबा गरड, जितेंद्र गायकवाड आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

राज्य सरकारने गोवंश हत्येवर बंदी घालून तिचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. संगमनेर पोलिसांनी आतापर्यंत त्यांनी चारवेळा कारवाई करून अनेक जनावरांना जीवदान देताना हजारो रुपयांचे मांस जप्त करून नष्ट केले आहे. नगरमध्ये अनेक कारखाने असताना पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. अशी कारवाई वारंवार होण्याची गरज व्यक्त होत आहे.