आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएफ जवानाचा वीज कोसळून मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - तालुक्यातील तांभोळ येथील सचिन भारत माने या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) आसाममध्ये कार्यरत जवानाचा वीज कोसळून मृत्यू झाला. त्याच्या निधनाच्या वृत्ताने तालुक्यावर शोककळा पसरली. शुक्रवारी (7 जून) त्याच्या पार्थिवावर तांभोळमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सचिनच्या कुटुंबीयांना वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, वृत्तवाहिन्यांवर सचिनसह आणखी दोन जवानांचा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. याबाबत सचिनच्या कुटुंबीयांनी लष्कराच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेतली.

वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येणारे वृत्त चुकीचे असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या विमान उपलब्ध नसल्याने गुरुवारी दिल्लीमार्गे सचिनचा मृतदेह पुण्यात व तेथून तांभोळ येथे आणण्यात येईल. सचिनच्या मागे आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी तो लष्करात दाखल झाला होता.