आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात 24 हजारांवर शेतकर्‍यांकडे कृषिकार्ड; बीसीएनएल कृषिकार्ड योजना अंतिम टप्प्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘महाकृषी 3’ योजनेला शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे 24 हजार शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेला जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. ही योजना सहा महिन्यांपर्यंत (7 आॅगस्ट) सुरू राहणार आहे. कृषिकार्ड योजनेचे यापूर्वी दोन टप्पे झाले आहेत. आता तिसरा टप्पा सुरू आहे. त्यालाही शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या योजनेंतर्गत वीस रुपयांत सीमकार्ड मिळणार आहे. त्यासाठी 128 रुपयांचे
रिचार्ज दरमहा आवश्यक आहे. कृषी ग्राहकांशी मोफत बोलता येईल. याशिवाय अन्य सुविधादेखील या योजनेत समाविष्ट आहेत.

प्रत्येक शेतकर्‍यास या योजनेंतर्गत तीन सीमकार्ड दिली जातील. महिनाभराच्या कालावधीतील सातबारा उतारा आवश्यक आहे. कृषी विभागाचा नमुन्यातील दाखला, रहिवासी पुरावा व रंगीत फोटो, तसेच कृषी अधिकार्‍याचा दाखला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
योजनेची मुदत सात आॅगस्टपर्यंतच
४या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे 1 लाख 45 हजार शेतकर्‍यांनी कार्ड घेतले होते. आताही शेतकर्‍यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ज्या शेतकर्‍यांनी कार्ड घेतले नाही, त्यांनी तालुक्याच्या ठिकाणाहून बीएसएनएलच्या कार्यालयातून कार्ड घ्यावे. या योजनेंतर्गत सहकारी शेतकर्‍यांशी चर्चा करून, पिकांचे नियोजन व इतर कामे करताना योजनेतील मोफत संभाषणाचा फायदा शेतकर्‍यांना होतो.’’
डी. एस. ठुबे, उपमंडल अभियंता (विपणन), बीएसएनएल.
कृषिकार्डाचे फायदे
400 मिनिटे मोफत टॉकटाइम.
200 बीएसएनएल व 100 इतर नेटवर्कसाठी एसएमएस.
200 एमबी इंटरनेट डाटा दरमहा.
सहा व बारा महिन्यांसाठी एकदाच रिचार्जची सोय.

(छायाचित्र - संग्रहीत बीएसएनएल लोगो )