आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल संघटनांचा आज, उद्या देशव्यापी संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारत संचार निगमला (बीएसएनएल) ब्राँडबॅण्ड मोबाइल इंटरनेटची ग्राहकांकडून मागणी आहे. ती पूर्ण करण्यास कंपनी असमर्थता दाखवत आहे. या सरकारी निर्णयाविरोधात मंगळवार आणि बुधवारी (२१ २२ एप्रिल) बीएसएनएलच्या सर्व एक्झिक्युटिव्ह नॉन एक्झिक्युटिव्ह युनियन असोसिएशनने संप पुकारला आहे

येथील टेलिफोन भवन समोर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घोषणा देण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी तिथेच कार्यालयाला मानवी साखळी करण्यात येईल. शहरातील ग्राहक सेवा केंद्रे बंद राहणार आहेत. सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलला घरघर लागली आहे. कंपनीकडे विस्ताराची कोणतीही योजना नाही.
लँडलाइनच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, मोबाइल सेवेसाठी टॉवर्स, एक्स्चेंज, केबल, ड्रॉप वायर, स्पेअर पार्टस्‌ वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात दिले जात नाहीत. ग्रामीण भागातील सेवांची भरपाई नाकारणे, तसेच अनेक सवलती काढून घेतल्याने विकास ठप्प झाला आहे. कंपनीची खासगीकरणाकडे वाटचाल होत अाहे. त्याला विविध संघटनांचा विरोध आहे.