आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे बीएसएनएलचे कामकाज ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ग्रामीण भागातील सेवांची तूट भरून काढा, उपकरणांची तातडीने खरेदी करावी, कुठलीही सहायक टॉवर कंपनी नको, स्पेक्ट्रमची सेंटरची शिफारस रद्द करा आदी मागण्यांसाठी सर्व एक्झिक्युटिव्ह नॉन एक्झिक्युटिव्ह युनियन असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे बीएसएनएलचे कामकाज ठप्प झाले. बुधवारीही (२२ एप्रिल) संप सुरू राहणार आहे.
येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजता सर्व संघटनांचे अिधकारी, कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. या संपात सर्वच संघटना सहभागी असल्याने दिवसभर बीएसएनएलचे काम ठप्प झाले होते. या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व ग्राहक सेवा केंद्रे बंद होते. सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलला घरघर लागली आहे.
कंपनीकडे विस्ताराची कोणतीही योजना नाही. लँडलाइनच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, मोबाइल सेवेसाठी टॉवर्स, एक्स्चेंज, केबल, ड्रॉप वायर, स्पेअर पार्टस् वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात दिले जात नाहीत. सेवांची भरपाई नाकारणे, तसेच सवलती काढून घेतल्याने विकास ठप्प झाला आहे. कंपनीची खासगीकरणाकडे वाटचाल होत अाहे. त्याला विविध संघटनांचा विरोध आहे.

बीएसएनएलची मालमत्ता बीएसएनएलच्या नावावर करा, केंद्र राज्य सरकारी कार्यालयात बीएसएनएल सेवा सक्तीची करा, डायरेक्टर्स पदाची भरती करा, डिलाईट कंपनीने सूचवलेल्या शिफारशी रद्द करा, मोफत स्पेक्ट्रम उपलब्ध करून द्या, बीएसएनएलची फोर जी सेवा सुरू करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी व्ही. बी. कोकाटे, आर. पी. शिंदे, आप्पासाहेब गागरे, प्रदीप जाधव, विजय पिंपरकर, बी. डी. महानूर, अशोक हिंगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय नगरकर, डी. एस. ठुबे यांच्यासह अिधकारी, कर्मचारी उपस्थित होते.