आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्‍हीलमधील सिलिंग वर्षभरात कोसळले...सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेले काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्‍हा रुग्णालयातील जिल्‍हा शल्य चिकित्सकांच्या दालनाबाहेरील प्रतीक्षा कक्षाचे सिंलिग मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक कोसळले. सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. बांधकाम होउन वर्षभराचाही कालावधी उलटला नसताना हा प्रकार घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तत्कालीन जिल्‍हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांच्या कालावधीत त्यांच्या दालनाच्या बाहेर प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात आले आहे. हे बांधकाम पूर्ण होऊन अद्याप वर्ष उलटलेले नाही. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर पत्र्याच्या छताखाली असलेले सिलिंग खाली कोसळले. काही कळण्याच्या आत हा सर्व प्रकार घडला. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने प्रतीक्षालयात कोणीही नव्हते. त्यामुळे दुर्घटना टळली. ही घटना घडली त्यावेळी पाऊस किंवा सोसाट्याचा वाराही नव्हता. अचानक सिंलिगचा अँल्युमिनियमचा आधार तुटल्याने हा प्रकार घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.

जलि्हा शल्य चििकत्सकांना भेटण्यासाठी सकाळी अकरानंतर गर्दी होते. तत्पूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे दुर्घटना टळली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावर या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या दीड वर्षात जलि्हा रुग्णालयात जवळपास दहा कोटी रुपये खर्चातून वविधि बांधकामे करण्यात आली आहेत. आणखीही काही कामे सध्या सुरू आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णालय प्रशासनाने तत्परता दाखवत तातडीने साफसफाई करत प्रतीक्षालयातील सिंलिंगचा कचरा हलवला.

औषधांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
जिल्‍हा रुग्णालयातील वविधि इमारतींमध्ये कोंबण्यात आलेल्या औषधांच्या सुरक्षेकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक चालवली आहे. ग्रामीण रुग्णालयांसाठीचा औषधाचा साठा याच ठिकाणी साठवण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा मिळेल तेथे औषधे ठेवण्यात आली आहेत. खिडकीच्या शेजारी ठेवण्यात आलेले औषधांचे बॉक्स पावसाच्या पाण्याने भिजून खराब झाले आहेत.

जिल्‍हा रुग्णालयातील विविध इमारतींमध्ये कोंबण्यात आलेल्या औषधांच्या सुरक्षेकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक चालवली आहे. ग्रामीण रुग्णालयांसाठीचा औषधाचा साठा याच ठिकाणी साठवण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा मिळेल तेथे औषधे ठेवण्यात आली आहेत. खिडकीच्या शेजारी ठेवण्यात आलेले औषधांचे बॉक्स पावसाच्या पाण्याने भिजून खराब झाले आहेत.