आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Building Of Temple Of Knowledge Ingratiation At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ध्यानमंदिराचे भूमिपूजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पाइपलाइन रस्त्यावरील ध्यानमंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे व नगरसेविका शारदा ढवण यांच्या हस्ते झाले. वृक्षारोपण करून कामाला सुरुवात करण्यात आली. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महाराष्ट्र विभागाचे प्रभारी बिपीन परमार, अनिल अग्रवाल, विजय हाके, पायरा वास्तुतज्ज्ञ रमेश खोमणे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक र्शीर्शी रविशंकर यांच्या दिव्य समाज निर्मितीच्या संकल्पनेनुसार ही वास्तू उभारण्यात येणार आहे. या वास्तूमुळे नगरच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर पडेल, अशी अपेक्षा कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त करण्यात आली. या ध्यानमंदिरात सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन प्रार्थना, भजन, सत्संग व आध्यात्मिक, सांस्कृतिक ज्ञानार्जन करणार आहेत. या वास्तूमुळे नगर शहरात एक आध्यात्मिक, सात्विक व सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन शहरातील तणाव कमी करण्यास मदत होऊन बंगलोरप्रमाणे नगरची चौफेर प्रगती होईल, असा विश्वास साधकांनी या वेळी व्यक्त केला.