आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिल्डमॅट’साठी 7 भव्य शामियाने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनतर्फे 20 जानेवारीपासून सुरू होणा-या बिल्डमॅट एक्झीबिशनची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या प्रदर्शनासाठी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे 5 एकर क्षेत्रात भव्य शामियाने उभारण्यात आले आहेत.
याविषयी माहिती देताना सहआयोजक राजेश उपाध्ये म्हणाले, सन 2004 मध्ये रोटरीतर्फे भरवण्यात आलेल्या रोटरी ट्रेड फेअरसारखेच भव्य प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. अहमदाबाद येथील लाभ डेकोरेटर यांच्याकडे शामियाने उभारण्याचे काम देण्यात आले आहे. मोठमोठ्या एक्सपोसाठी ज्या दर्जाचे शामियाने असतात, तसेच हे शामियाने असतील. 70 गुणिले 90 फुटांची एकूण 7 दालने तेथे असतील. या दालनांमध्ये 150 स्टॉल असतील. त्यात बांधकाम, फर्निचर, ऑटोमोबाईल, अ‍ॅग्रीकल्चर, फायनान्स, होम अप्लायन्स, लघुउद्योग, शिक्षण असे विभाग असतील. मध्यभागी एक एकरावर मशिनरी यार्ड असेल. तेथे जेसीबी, पोकलेन, वॉटर ट्रिटमेंट प्लँट आदी प्रदर्शित केली जातील. नगर जिल्ह्याबरोबरच पुणे, नाशिक व औरंगाबाद येथील उद्योजक, व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
प्रदर्शन 5 दिवस चालणार असून, या काळात विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. अनेक मान्यवर या परिसंवादात सहभागी होतील, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली. प्रदर्शनाच्या यशस्वीततेसाठी संघटनेचे अध्यक्ष अशोक काळे, प्रोजेक्ट चेअरमन जवाहर मुथा यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून नगरकरांकडून प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.