आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव, चितळे रस्त्यावर पाच घरफोड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव परिसरातील लिंक रोड चितळे रस्ता परिसरात काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून दुकाने काही गाळे फोडून चोरी केली. केडगावातील चार गाळ्यांचे शटर उचकटून एका बिल्डरच्या कार्यालयातून हजारांचा ऐवज फोडून रोकड किराणा माल असा सुमारे ४६ हजारांचा ऐवज लांबवला.

केडगाव लिंक रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये आदित्य बिल्डर्स डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री वाजता कार्यालय बंद करुन जालिंदर लक्ष्मण पालवे हे निघून गेले. रात्री चोरट्यांनी आदित्य बिल्डर्स कार्यालयाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्याची उचकापाचक करुन हजारांची रोकड लांबवली.

नंतर याच अपार्टमेंटमधील तीन गाळ्यांचे शटर उचकटून आत प्रवेश करुन उचकापाचक केली. तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. सकाळी सहा वाजता तेथील रहिवाशांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. जालिंदर पालवे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.

चितळे रोड परिसरातील क्वालिटी किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ४० हजारांची रोकड किराणा माल असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. सकाळी उजाडल्यानंतर हा चोरीचा प्रकार उजेडात आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक विनोद चव्हाण हे घटनास्थळी आले. तपास पोलिस हवालदार पवार हे करीत आहेत.

एकाच दिवशी पाच ठिाकाणी घरफोडीचे प्रकार झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर पोलिसांनी गस्त वाढवली असल्याचे सांगितलेे. लिंक रोडवरील पालवे यांच्या कार्यालयात घरफोडी केल्यानंतर चोरट्यांनी दीपक जाधव, रत्नाकर पवार, धनंजय बाबडे, गुरमीत बाबर यांचे गाळेही फोडले. पण, तेेथे चोरट्यांना काहीच मिळाले नाही.

सावेडीत पुन्हा चेनस्नॅचिंग सुरु
सावेडी परिसरात पुन्हा चेन स्नॅचिंगचे प्रकार सुरु झाले आहेत. शुक्रवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी धूमस्टाइलने चोरुन नेले. हा प्रकार सावेडीतील रासनेनगर परिसरात घडला. याप्रकरणी सुप्रिया सोमदत्त वैद्य (मानाजीनगर, नऱ्हे, पुणे, हल्ली रासनेनगर, सावेडी) यांनी तोफखाना ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैद्य या रस्त्याने पायी जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरुन दोन अनोळखी युवक त्यांच्या जवळ आले. वैद्य यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले वेगाने तेथून धूम ठोकली. वैद्य यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. याप्रकरणी वैद्य यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.