आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बु-हाणनगर योजनेचे जलसंकट तूर्त टळले, कर्डिले यांची पालकमंत्र्यासमवेत सोमवारी होणार बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या पाच प्रादेशिक पाणी योजनांपैकी चार योजनांचे पैसे थकल्याने संबंधित ठेकेदारांनी काम थांबवण्याचा इशारा आठ दिवसांपूर्वी दिला होता. सकारात्मक तोडगा निघाल्याने मिरी-तिसगाव बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. दरम्यान, आमदार शिवाजी कर्डिले यांनी शुक्रवारी सायंकाळी हस्तक्षेप करून या योजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. त्यामुळे या योजनांवरील जलसंकट तूर्त टळले आहे.

प्रादेशिक पाणी योजनांचे काम पूर्ण केल्यानंतर त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या जातात. जिल्हा परिषद काही दिवस या योजना चालवते. नंतर स्थानिक समिती स्थापन करून योजना हस्तांतरीत करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक प्रादेशिक पाणी योजना सध्या समितीमार्फत चालवल्या जात आहेत. पण या पाच प्रादेशिक पाणी योजना समित्या स्थापन होत नसल्याने जिल्हा परिषदेला चालवाव्या लागत आहेत.
योजनेतील लाभार्थी ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला या योजना चालवणे डोईजड झाले आहे.जिल्हा परिषदेमार्फत शेवगाव-पाथर्डी (५४ गावे), मिरी-तिसगाव (२२ गावे), बुऱ्हाणनगर (४४ गावे), गळनिंब-शिरसगाव (१८ गावे) चांदा (५ गावे) या योजना चालवल्या जातात. स्थानिक समित्या स्थापन करून त्या हस्तांतरित कराव्यात, असे सांगत नवीन निविदा अथवा मुदतवाढ देण्यास सभागृहाने मागील सर्वसाधारण सभेत विरोध केला. त्यामुळे जानेवारीपासून या योजना चालवणाऱ्या ठेकेदारांना देणी दिलेली नाहीत. ठेकेदारांना योजना चालवणे अडचणीचे झाले असून त्यांनी योजना चालवण्यास नकार दिला आहे. समित्या स्थापन करून योजना हस्तांतरित करून घ्याव्यात, असा जिल्हा परिषदेचा आग्रह आहे.

समाधानकारक तोडगा निघाल्यामुळे बुऱ्हाणनगर मिरी-तिसगाव योजना गुरुवारी बंद पडल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन टंचाईत उद््भवल्याने लोक संतापले. आमदार कर्डिले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांच्याशी चर्चा केली. टंचाई कालावधीत योजना बंद केली, तर ताब्यात घेणार नाही. जिल्हा परिषदेने आजच योजना सुरू करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, अशी तंबीही त्यांनी दिली. यासंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (१३ एप्रिल) बैठक बोलावून त्यात निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले. त्यानंतर सायंकाळी उशिरा कार्यकारी अभियंता कदम यांनी योजना सुरू करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना दिले. योजनेवरील जलसंकट तूर्त टळले असले, तरी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभियंत्यांची भेट

पाणी योजना ऐन टंचाईच्या कालावधीत बंद पडल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, बाजीराव गवारे दत्तात्रेय सदाफुले यांनी कार्यकारी अभियंता कदम यांची भेट घेतली. यावेळी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच ठेकेदार उपस्थित होते. या सर्व लोकप्रतिनिधींनी योजना तातडीने सुरू करण्याची विनंती केली.

बैठकीत निर्णयाची अपेक्षा

योजना सुरू करण्याच्या सूचना शुक्रवारी सायंकाळी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यात सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत योजना सुरू करण्यात आल्या आहेत.'' सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता.

सकारात्मक तोडगा काढू

एकूण पाण्याच्या तुलनेत प्रत्यक्ष किती पाणी लाभार्थी गावांना पोहोचते, याचे ऑडिट नाही. ग्रामपंचायतींनी वेळेत पाणीपट्टी भरली असती, तर हा प्रश्नच उद््भवला नसता. पण नियमानुसार समिती स्थापन करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करून तोडगा काढू.'' संदेशकार्ले, सभापती.

अन्यायाची भावना

३८ प्रादेशिक पाणी योजना स्थानिक समित्यांमार्फत चालवल्या जातात. त्यात कुरणवाडी, घोसपुरी, बारागाव-नांदूर, तळेगाव दिघे योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषद पाच प्रादेशिक योजना स्वत: चालवते. त्यामुळे योजना चालवणाऱ्या समित्यांमध्ये अन्यायाची भावना आहे. आमचीही योजना चालवावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

...तर रस्त्यावर उतरू

योजना तातडीने सुरू केल्यास समिती ती ताब्यात घेणार नाही. आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, असे मी स्पष्ट सांगितले. त्यानंतर योजना सुरू केल्याचे अभियंत्यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री राम शिंदे यांच्याशी चर्चा करून १३ ला बैठक होत आहे. त्यावेळी या योजनांसदर्भात चर्चा होईल.'' शिवाजीकर्डिले, आमदार