आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुंबईतील आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळल्याच्या निषेधार्थ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी लक्ष्मी कारंजा येथील पक्ष कार्यालयासमोर दहन करण्यात आले.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक सुवेंद्र गांधी, गौतम दीक्षित, बाबासाहेब दळवी, मनेष साठे, अशोक कानडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

आगरकर म्हणाले, आदर्श प्रकरणाचा अहवाल बासनात गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी तातडीने राजीनामा द्यावा. गट्टाणी म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी भ्रष्टाचार मिटवा असे म्हणतात व दुसरीकडे त्यांचेच मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे काम करतात. गल्लीत एक व दिल्लीत एक, अशी काँग्रेस नेत्यांची भाषा आहे.

आदर्श प्रकरणावरून झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.