आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित लवाद आज विचारणार जाब, कामांची निविदा प्रक्रिया अद्याप रखडलेलीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बुरूडगाव कचरा डेपोतील विविध कामांबाबत राष्ट्रीय हरित लवादासमोर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यात लवादाकडून मनपा प्रशासनाला डेपोतील कामांबाबत जाब विचारण्यात येणार आहे. तत्पूर्वी लवादाने ऑगस्टला बुरूडगाव कचरा डेपोची प्रतिनिधीमार्फत पाहणी करून अहवाल तयार केला आहे.
कचरा डेपोचा वाद मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय हरित लवादापुढे सुरू आहे. प्रशासनाची वेळोवेळी कानउघाडणी करूनही कचरा डेपोतील कामांचा प्रश्न सुटलेला नाही. कोणतीही प्रक्रिया करता शहरातील सर्व कचरा या डेपोत टाकण्यात येतो. यासंदर्भात बुरूडगाव येथील शेतकरी जनार्दन कुलट, भाऊसाहेब कुलट महेश जाधव यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली आहे. लवादासमोर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. लवादाकडून प्रशासनाची कानउघाडणीदेखील झाली, परंतु निर्ढावलेल्या मनपा प्रशासनाने लवादाच्या आदेशाला वेळोवेळी केराची टोपली दाखवली.

लवादाने दंडात्मक कारवाई सुरू केल्यानंतर मात्र अधिकारी पदाधिकारी खडबडून जागे झाले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून डेपोतील कामांसाठी तब्बल अकरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. महासभेत या कामांची मंजुरी घेऊन तसा अहवाल लवादासमोर सादर करण्यात आला. या कामांची निविदा प्रक्रिया १६ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश लवादाने यापूर्वीच दिले होते. परंतु मनपा प्रशासनाने नेहमीप्रमाणे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवादाकडे मुदतवाढ मागितली. लवादाने मुदत वाढवून दिली, तरीदेखील निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मागील सुनावणीत मनपा अधिकाऱ्यांनी पुन्हा मुदतवाढीचे रडगाणे सुरू केले. त्यामुळे संतापलेल्या न्यायमूर्तींनी अतिरिक्त आयुक्त वालगुडे प्रकल्पप्रमुख आर. जी. मेहेत्रे यांची चांगलीच हजेरी घेतली. “तुम्हाला साधी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येत नाही, मग तुम्ही काय काम करता?’ अशा शब्दांत न्यायमूर्तींनी मनपा अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये झालेल्या सुनावणीत लवादाने थेट स्वतंत्र प्रतिनिधी नेमून बुरूडगाव कचरा डेपोची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत सादर करण्यात येणार आहे. या सुनावणीत डेपोतील सत्य परिस्थिती लवादासमोर येणार असल्याने मनपा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

पाहणीत आढळले मांस
डेपोत जनावरांचे मांस असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्तींनी मनपा अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत डेपोची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधीची नियुक्ती केली. या प्रतिनिधीने अडीच तास पाहणी केली. डेपोत जनावरांचे मांस टाकण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.

महापालिकेने आता तरी जागे व्हावे...
^मनपा प्रशासन खोटी माहिती सादर करून लवादाची वारंवार दिशाभूल करत आहे. त्यामुळेच लवादाने स्वतंत्र प्रतिनिधी नेमून डेपोची पाहणी केली. या पाहणीत डेपोत मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस अाढळून आले. त्याचे सर्व छायाचित्रे सविस्तर अहवाल लवादासमोर सादर होणार आहे. मनपा प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.'' राधाकिसन कुलट, उपसरपंच, बुरूडगाव.
बातम्या आणखी आहेत...