आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराम बस-इनोव्हा अपघातात तिघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खासगी आराम बस व इनोव्हाची समोरासमोर धडक होऊन इनोव्हातील दोन महिलांसह दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास नगर-औरंगाबाद मार्गावरील इमामपूर घाटात हा भीषण अपघात झाला. मृत व जखमी औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगावचे रहिवासी आहेत.

अन्सा करजाना हमीदअली (56), सना तजीन शहाजहान अली (24), हशीर अली शहाजहान अली (दीड महिना) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. सय्यद मोहंमदअली हमीदअली (28), सय्यद हमीद इक्रमअली (57), सय्यद सलाम सय्यद सलीम हे जखमी आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंगळुरूला जाण्यासाठी पडेगावचे सय्यद कुटुंबीय इनोव्हाने (एमएच 20 बीवाय 6083) पुण्याच्या विमानतळाकडे निघाले होते. नगरकडे येत असताना इमामपूर घाटात खासगी आराम बस (एमएच 27 ए 9607) व त्यांच्या इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आराम बसचा चालक बस सोडून पसार झाला आहे. डॉ. सय्यद मोहंमदअली यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.