आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवासे फाट्याजवळ अपघातात 18 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन 18 जण जखमी झाल्याची घटना नेवासे-शेवगाव रस्त्यावरील भानसहिवरे शिवारात घडली. गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. 16 जखमींवर जिल्हा रुग्णालयात, तर गंभीर जखमी असलेल्या बसचालक व वाहकावर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व जखमी प्रवासी शेवगाव तालुक्यातील आहेत.

शेवगाव आगाराची शेवगाव-नाशिक बस (एमएच 06 एस 8301) सकाळी नाशिककडे जात होती. नेवासे फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर र्शीरामपूरहून अमरापूरकडे 15 टन सिमेंट घेऊन निघालेला ट्रक (एमएच 21 9722) व बसची समोरासमोर जोराची धडक झाली. दोन्ही वाहनांच्या चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले. ट्रकचालक, बसचालक व वाहकासह 18 जण जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

जखमींची नावे
सुभाष दामोदर उदागे (बसचालक), इ. एस. पठाण (वाहक), जालिंदर गणपत कातकडे (ट्रकचालक), गंगाधर लक्ष्मण काटे, राजेंद्र रामविलास खटोड, सुरेश रामप्रसाद परदेशी, देविदास मुंजाराम लांडगे, साबूराव शाहूराव वाघमारे, बाबू साहेबराव घोगरे, अण्णासाहेब पांडुरंग शेळके, सय्यद तौफीक, सतीश कुलकर्णी, पार्वती नजन, सुरेखा धनवटे, ज्ञानेश्वर बडे, दिनेश मुरदारे, महादू मोरे, भाऊसाहेब नजन यांचा जखमींत समावेश.

रुग्णालयाची अनास्था
नेवासे आगाराचे वाहतूक नियंत्रक एकनाथ पिटेकर यांनी अपघातानंतर तत्काळ एका मिनी बसची व्यवस्था करून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यासंबंधी रुग्णालयाच्या प्रशासनाला पूर्वकल्पनाही देण्यात आली होती. मात्र, बसमधून जखमींना घेऊन जाण्यासाठी ना स्ट्रेचर होते ना कर्मचारी. नियंत्रक पिटेकर यांनी मिनी बसच्या वाहक व चालकांची मदत घेऊन सर्व जखमींना अपघात कक्षात दाखल केले.