आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील उद्योग-व्यवसायांना अघोषित भारनियमनाचा फटका; भाजपचा घेराव, काँग्रेसचा ठिय्या, सेनेची निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन सुरू केल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीने आंदोलन करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. राज्यात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने देखील भारनियमनाविरोधात महावितरण कार्यालयात शुक्रवारी ठिय्या दिला. भाजपपाठोपाठ काँग्रेसने देखील आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मोर्चे काढून आंदोलने करूनही भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे शहरातील लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात अार्थिक नुकसान सुरू आहे. 
 
महावितरणने अचानक सुरू केलेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर शहरातील लहान-मोठे उद्योग-व्यवसायही थंडावले आहेत. वीज नसल्याने अनेक व्यावसायिक हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे त्यांना ऐन सणासुदीच्या काळात दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी जगताप यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन मोडून काढले. दोन दिवसांपूर्वी शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पुन्हा महावितरण कार्यालयात आंदोलन करून भारनियमन त्वरित रद्द करण्याची मागणी केली. 

परंतु यावेळी देखील पोलिसांनी आंदोलकांना पुन्हा ताब्यात घेतले. संतापलेल्या नागरिकांनी गुरुवारी तेलीखुंट सावेडी परिसरातील महावितरणच्या कार्यालयांना टाळे लावले, तरी देखील शहरातील भारनियमन सुरूच राहिल्याने केंद्रात राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने महावितरणच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला. भाजपपाठोपाठ काँग्रेसने देखील आंदोलन केले. शिवसेनेने देखील उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून भारनियमनामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. शहरातील शेकडो लहान-मोठे उद्योग-व्यवसाय थंडावले आहेत. सर्वसामान्य या भारनियमनामुळे त्रस्त झाले आहेत. मोर्चे काढून आंदोलने करूनही भारनियमनाचा प्रश्न जैसे थे आहे. महावितरण सरकार विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 
 
सोशल मीडियात भाजपवर टीका 
भारनियमनामुळेसंतापलेल्या नागरिकांनी केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात शहर भाजपने भारनियमनाच्या विरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला. भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी किशोर डागवाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या आंदोलनाची नगरकरांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली. आता हेच पहायचे राहिले होते, अशा अनेक पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर फिरत होत्या. 
बातम्या आणखी आहेत...