आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Businessman Come In City Due To Shivsena Mp Anil Rathod

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठे व्यावसायिक नगरमध्ये येतात, ते केवळ शिवसेनेमुळेच - आ.अनिल राठोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कापडबाजाराची सुरक्षा महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यापारी सुरक्षित राहिला पाहिजे. विकासाबरोबरच संरक्षणदेखील गरजेचे आहे. त्यामुळेच संपूर्ण संरक्षण, निरंतर सेवा, चोवीस तास लक्ष हे सेनेचे ब्रीद आहे. राज्यातील मोठे व्यवसायिक आता नगरमध्ये येत आहेत ते केवळ शिवसेनेमुळेच, असे प्रतिपादन आमदार अनिल राठोड यांनी केले.
कापडबाजार परिसरातील भिंगारवाला चौकात आमदार राठोड यांच्या खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रविवारी त्याचे लोकार्पण करताना राठोड बोलत होते. यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड, कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्होरा, भगवान फुलसौंदर, नगरसेवक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, व्यापा-यांनी भरलेल्या करांवर राज्य चालते, परंतु व्यापा-यांचे म्हणणे ऐकायला कोणाकडेही वेळ नाही. केंद्रात सत्ता बदल झाला, तसाच बदल राज्यात होणार आहे. आता महायुतीचे सरकार येणार आहे.
शहरात सध्या छोट्या कामांचेही मोठे फ्लेक्स लावण्याचे काम सुरु आहे. फ्लेक्स लावून राजकारण करणारे कधीच पुढे येऊ शकत नाहीत, अशी टीका राठोड यांनी महापालिकेतील सत्ताधा-यांवर केली. व्यापा-यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असे सांगून ते म्हणाले, संघटित होणे काळाची गरज आहे. हातगाडीचालकांवर पोलिस लाठीचार्ज करतात, परंतु पंचतारांकित हॉटेलांवर कारवाई करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही.