आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Jitendra Bhatia Murder Case, Wife Hema Arrested

भाटियांची पत्नी हेमा व आरोपी कोकाटेत प्रेमसंबंध, दोघांनी मिळून काढला काटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - शहरातील गंजपेठ बाजारातील तरुण व्यापारी जितेंद्र भाटिया यांची हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे पुढे येत आहे. जितेंद्र भाटिया यांची पत्नी हेमा भाटिया आणि या हत्याप्रकरणातील गजाआड असलेला संशयित आरोपी प्रदीप कोकाटे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने हेमा व प्रदीप कोकाटे या दोघांनी मिळून जितेंद्र यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. रविवारी पोलिसांनी मृत जितेंद्र भाटिया यांची पत्नी हेमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यातून या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हेमा भाटिया व उल्हासनगर येथे राहणा-या तिच्या भावाला अटक केली आहे.
27 एप्रिलला रात्री सव्वानऊच्या सुमारास भाटिया यांची गंजबाजारातील त्यांच्या दुकानात गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. हत्या होण्याच्या काही वेळापूर्वी तसेच काही दिवसांपासून जितेंद्र यांचे बंधू शंकर यांच्या मोबाइलवर 30 लाखांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी खंडणीसाठी ही हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला. तपासही त्याच दिशेने सुरू झाला. नंतर आयपीएलमधील सट्टेबाजी, आर्थिक व सोनेखरेदीचा व्यवहार अशा विविध कारणांमुळे भाटियांचा खून झाला असावा अशा चर्चांचे पेव फुटले होते. पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार व प्रथमदर्शनी हे प्रकरण खंडणीतून घडल्याचे सांगितले जात होते. तरीही पोलिसही सर्व शक्यता पडताळत गुन्ह्याचा अथक तपास करत होते. यासाठी 7 हून अधिक जणांची चौकशी पोलिसांनी केली. रविवारी मात्र पोलिस तपासाला अचानकपणे कलाटणी मिळाली. भाटिया यांची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची माहिती मिळाली. अखेर आज सकाळी या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
भाटियांची हत्या खंडणीसाठी झालेली नाही, हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानंतर रविवारी सकाळी सिद्धार्थनगर परिसरातून पोलिसांनी नगरमधील आणखी एका युवकाला ताब्यात घेतले. त्याने प्रदीप कोकाटेला पिस्तूल पुरवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात चौकशी सुरू केली. या युवकाकडून पोलिसांनी आणखी एक पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी दुपारी जितेंद्र भाटिया यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर उल्हासनगर येथे राहणा-या तिच्या भावालाही अधिक चौकशीकरिता पोलिसांनी बोलावून घेतले. एका खास पथकाने त्याला उल्हासनगरहून नगरला आणले. कोकाटेसह ताब्यात घेतलेल्या चौघांचीही एमआयडीसी पोलिस ठाण्यात कसून चौकशी सुरू होती. त्यावेळी हेमा भाटिया उडवीउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याचवेळी कोकाटेही विसंगत उत्तरे देत होता.
या प्रकरणाचा गुंतागुंत वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...