आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By 2025, India Will Jagatguru Dr. Senior Computer Expert. Vijay Bhatakara

भारत 2025 पर्यंत जगत्गुरू होईल- ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-अध्यात्म आणि विज्ञानाच्या जोरावर भारत इतर देशांच्या तुलनेत अग्रेसर आहे. आपल्या देशात संस्कृती आणि निती जपणारी माणसे आहेत. आगामी काळात जगाला ज्ञान देणारा देश म्हणून भारत ओळखला जाणार आहे. युवाशक्ती हीच भारताची खरी ताकद आहे. युवाशक्तीला ज्ञानाची व अध्यात्माची शिदोरी मिळाल्याने सन 2025 पर्यंत भारत ‘जगत्गुरू’ होईल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात डॉ. भटकर बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, अँड. दीपलक्ष्मी म्हसे, रामचंद्र दरे, प्राचार्य बी. एच. झावरे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा डॉ. भटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ. भटकर म्हणाले, महिलांवरील अत्याचार वाढत असले, तरी येणारा काळ महिलांचाच असेल हे पुरुषांनी लक्षात ठेवावे. आतापर्यंत आपला देश शेतीप्रधान म्हणून ओळखला जात होता. यापुढे मात्र भारत आयटीप्रधान होऊन उपजीविकेचे ते महत्त्वाचे साधन बनणार आहे. सध्याच्या काळात अर्धवट ज्ञानाचा उपयोग नाही. अर्धवट ज्ञानी माणूस घातक असू शकतो. त्यामुळे जो परिपूर्ण ज्ञान आत्मसात करील, तोच जगात पुढे जाईल. पुढील काही दशकांत आपण चीनच्याही पुढे असू, असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. नवनाथ येठेकर यांनी केले, तर आभार प्रा. आर. जी. कोल्हे यांनी मानले. डॉ. भटकर यांचे विचार ऐकण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.